खमंग कोथिंबीर वडी -
How to make Kothimbir Vadi in marathi
आज आपण कोथिंबीर वडी पाहणार आहोत जी आपल्या जिभेवर चव आणते नक्की करून पहा...!!!
साहित्य:
२ जुड्या कोथिंबीर
७-८ हिरव्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
१ इंच आले बारीक वाटून
१ वाटीभर डाळीचे पीठ
२ टेबलस्पून बारीक रवा
मीठ
१ चिमूट खायचा सोडा
तळण्याकरता तेल
कृती:
• कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून
कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे.
एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर
डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी,
मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे.
कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून
खरपूस तळावेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा