डोसा - simple breakfast dosa recipe in marathi
डोसा हा एक नाश्त्याचा प्रकार आहे जो सकाळी खाल्ला जातो याची करण्याची पद्धत सुद्धा सोप्पी आहे आज ती आपण पुढे पाहणार आहोत...!!!
साहित्य:
तीन वाटया तांदूळ
एक वाटी उडीदडाळ
पाऊण वाटी तूरडाळ
मुठभर पोहे, तेल
दोन ते तीन चमचे आंबट दही
चवीपुरते मीठ.
कृती:
प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत
टाकावे. पोहेसुध्दा भिजत टाकावेत.
आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे
व एकत्र करावे .त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व
पीठ आंबण्यासाठी ठेवावे.
पीठ आंबल्यानंतर तवा गैसवर ठेऊन चांगला
तापवावा .त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या
पाण्याचा शिडकावा करावा.
नंतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून
वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे. थोडया वेळाने
डोसा आपोआप सुटून येईल.
त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर
किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा...!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा