पिझ्झा - How to make pizza at home recipe in marathi

पिझ्झा - How to make pizza at home recipe in marathi 

How to make pizza at home recipe in marathi


साहित्य:

पीझ्झा ब्रेड साठी:
२५० ग्रॅम मैदा
१० ग्रॅम खमीर
१ छोटा चमचा साखर
४ लहान चमचे तूप
१/२ छोटा चमचा मीठ
मसाल्यासाठी:
१/२ किलो टोमॅटो
२ कांदे
४ कळी लसूण
१ तुकडा आले
·१ ढोबळी मिरची
१ कप बारीक चिरलेली पत्ता कोबी
मीठ चवीनुसार
१/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
१/४ लहान चमचा गरम मसाला
१ लहान चमचा साखर
१ लहान चमचा कॉर्नफ्लावर
१०० ग्रॅम चीज
कृती: मैद्यात मीठ, साखर व मीठ व खमीर टाका व तूप
आणि पाणी टाकून मळून घ्या.
अर्ध्या तास ठेवल्यानंतर त्यचे चार लहान गोळे तयार
करा. थोडे जाड लाटून घ्य. ओवन २०० डिग्री से. ला
गरम करा.
१० मिनीटे १-२ करुन चारी पोळ्या ( पीझ्झा ब्रेड )
भाजून घ्या. टॉमेटो, कांदा, आल, लसूण बारीक चिरुन
एका कढईत टाकून भजून घ्या.
पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर, साखर,
मीठ व गरम मसाला टाका. एका वाटीत थोडे पाणी
घेऊन त्याच्यात कॉर्नफ्लावर टाका.
हे मिश्रण गॅसवरील टॉमेटोच्या मिश्रणात टाका.
मिश्रण जाडसर झाल्यावर त्याच्यात ढोबळी मिरची व
गाजर बारीक चिरुन टाका.
२ मिनीटे भाजून गॅस बंद करा. आता पीझा बेसवर
हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा. हा ब्रेड
ओव्हनमध्ये १५० डिग्री से. ला ७ ते ८ मिनीटे ठेवा.
आता बाहेर काढून त्याच्यावर टोमेटो सॉस टाकून
गरम वाढा. खाण्याच्या सोईकरता चाकूने चिरुन लहान
तुकडे करा.
 (जर पीझ्झा बेस बाजारात मिळत असेल तर तेही
आणून वर दिल्यानुसार मसाला टाकून पीझ्झा तयार
करा.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा