चहा - Tea making recipe in marathi

चहा प्रेमींसाठी साठी खास चहाची रेसिपी देत आहोत आजच्या धकाधकीच्या जीवनात मूड फ्रेश करण्यासाठी चहा मिळण गरजेच आहे.त्यामुळे हि चहाची रेसिपी एकदा पहाच...!!!
Tea making recipe in marathi
चहा साहित्य: २ चहाचे कप पाणी अडीच चहाचे कप दुध ३ ते ४ टिस्पून साखर किंवा चवीनुसार २ टिस्पून चहा पावडर १/२ टिस्पून किसलेले आले किंवा २ पाती गवती चहा किंवा १/२ टिस्पून वेलची पूड किंवा दीड चमचा चहाचा मसाला 

कृती: दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले/ गवती चहा/वेलचीपूड/चहाचा मसाला घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे. दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. [ पाण्यामध्ये दुध घातले असल्याने मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे लक्ष ठेवावे. चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. आच बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरमच सर्व्ह करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा