कांदे पोहे - Kande pohe recipe in marathi
आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात अन्न हे रोजच्या जगण्याचा भाग आहे.आणि त्यात आपण दिवसाची सुरुवात सकाळच्या नाश्त्याने करतो,त्यातीलच एक असा खाद्यपदार्थ जो प्रत्येकजण आवडीने खातो आणि तो म्हणजे कांदे पोहे - kande pohe recipe in Marathi आणि हे कसे करावे ते आज आपण पाहणार आहोत..!!!
साहित्य:
तीन वाटी पोहे
दोन कांदे
आठ - दहा कडीपत्ता पाने
थोडीशी कोथंबिर
चार ते पाच मिरच्या
एक छोटा चमचा जिरे
एक छोटा चमचा मोहरी
एक छोटा चमचा हळद
अर्धी वाटी शेंगदाणे
चवीप्रमाणे मीठ
चार ते पाच चमचे तेल
चिमुटभर साखर
थोडासा खोबऱ्याचा किस
कृती:
पोहे पाण्याने स्वच्छ एकदा धुवून घेणे,
चाळणीत पोह्याचे पाणी नितळुन घेणे,
या नंतर पोह्यात चवीप्रमाणे मिठ घालावे,
नंतर गॅसवर कडई ठेवावी.
कडई मध्ये तेल घालावे ते जरा गरम होऊ द्यावे,
नंतर तेलात जिरे-मोहरी चांगली तडतडू द्यावी,
त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा,
लाल रंग होईपर्यंत परतून घ्यावा,
त्यामध्ये कडीपत्ता घालावा,
मिरची बारीक चिरून घालावी,
आणि त्यात शेंगदाणे घालावे,
हे सर्व मिश्रण चांगले परतून घ्यावे,
मग त्याच्यात हळद घालावी,
भिजवलेले पोहे घालावे,
आणि सर्व एकजीव होईपर्यंत परतावे,
मग शेवटी चिमुटभर साखर व कोथिंबीर घालावी,
त्यावर झाकण ठेवून दोन मिनट वाफवू द्यावे,
नंतर गॅस बंद करावा.
टिपः शेंगदाणे तेलात जास्त भाजू नये आणि पोह्यांवर लिंबू पिळून व थोडी बारीक पिवळी शेव थोडासा खोबऱ्याचा किस टाकून खाणे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा