उपमा - Upma simple breakfast recipe in marathi
उपमा हा एक नाश्त्याचा प्रकार आहे जो सकाळी खाल्ला जातो याला उपीट सुद्धा म्हणतात याची करण्याची पद्धत सुद्धा सोप्पी आहे आज तो आपण पुढे पाहणार आहोत...!!!
साहित्य:
१ वाटी बारीक रवा
बारीक कापलेला कांदा
कापलेली हिरवी मिरची
१०० ग्रा. मटार
१ चमचा मीठ
१ चमचा मोहरी
कोथिंबीर
१ चमचा मुग डाळ
तेल
कृती:
पहिले कढईत रवा टाकुन भाजावे. आता वेगळ्या
कढईत एक पळी तेल टाकुन मोहरी व कांदा,हिरवी मिरची,मटार
टाकुन २-४ मिनिट भाजावे.
जेव्हा शिजतील तेव्हा टोमॅटो व सुके
मसाले टाकुन साडेतीन कप पाणी टाकावे.
उकळी आल्यावर भाजलेला रवा टाकुन चांगल्या
तर्हेने शिजवायला ठेवावा.
१० मिनिट शिजवल्यानंतर वरुन कापलेली कोथिंबीर
टाकावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा