झणझणीत मिसळ तर्री/कट - misal tarri recipe in marathi
आज आपण पाहणार आहोत एक झणझणीत अशी मिसळ तर्री/कट/सँपल/रस्सा अशी बरीच नाव असलेली ही misal tarri recipe in marathi आणि ही प्रामुख्याने मिसळ,वडा,पोहे,पाव,या सर्वांचा तर्री हा महत्वाचा भाग आहे आणि यासोबत ती खाल्ली जाते..!!
तरी आज आपण तिची झणझणीत मिसळ तर्री/कट- misal tarri recipe in marathi पाहणार आहोत..!!
दोन कांदे
दोन टोमॅटो
एक इंच आदरक
लसणाच्या पाकळ्या चार ते पाच
एक तुकडा सुख खोबरं
थोडीशी कोथंबिर
एक छोटा चमचा हळद
एक छोटा चमचा जिर मोहरी
चवीनुसार मिठ
मिरची पावडर
मिसळ मसाला
एक छोटा चमचा धना पावडर
एक छोटा चमचा जिरे पावडर
एक छोटा चमचा गोडा मसाला
चिंच आणि गूळ
लिंबू आणि मिसळ फरसान
सात आठ चमचे तेल
कृती:
मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
एका लहान पातेल्यात दीड ग्लास पाणी घालावे,
आणि ते बोईल होण्यासाठी गॅस वर ठेवावे,
मटकी त्या गरम पाण्यात वाफवून घ्यावी.
आणि मग त्यामधे हळद मिठ घालावे,
गॅसवर कडई ठेवावी.
त्यामध्ये सात आठ चमचे तेल घालावे,
मोहरी आणि जिरे घालावे,
नंतर कांदा बारीक चिरून घ्यावा,
मोहरी तडतडू लागली की बारीक चिरलेला कांदा घालावा,
कांदा लाल होई पर्यंत आपण हिरव वाटण तयार करूया,
वाटणामध्ये आद्रक लसूण सुक खोबर आणि भरपूर कोथमबिर घालावी आणि ते वाटून घ्यावे,
नंतर कांदा लाल झाला की त्यामध्ये दोन टमाटो बारीक चिरून घालावे,
त्याला तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे,
त्यामध्ये आपण तयार केलेले हिरव वाटण घालावे,
आणि ते तेल सुटेपर्यंत परतावे,
त्यामध्ये सुके मसाले घालावे,
सुके मसाले - मिरची पावडर,हळद,मिसळ मसाला,धना पावडर,जिरे पावडर,गोडा मसाला,
वाफवलेली मटकी त्यात घालावी आणि ते सगळं मिसळून घ्यावे,
तुम्हाला जेवढा कट हवा असेल त्याप्रमाणे पाणी घालावे,
चिंचेचं आणि गुळाचे कोळ केलेले पाणी त्यामध्ये घालावे,
दोन तीन उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे,
चवीप्रमाणे मीठ घालावे,
नंतर गॅस बंद करावा.
टिपः शिजत असताना त्यावर झाकू नये तर्री निघून जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा