बटाटा वडा - batata vada recipe in marathi

 बटाटा वडा - batata vada recipe in marathi

बटाटा वडा म्हणजे वडापाव हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला आपलंसं करणार आहे बटाटा वडा हा कटासोबत आणि सांबार सोबत खाण्यासाठी वापरतात आणि आपण सगळेच वडा सँपल, वडा सांबर,तर्रीवडा,वडापोहे आणि आपल्या सर्वांचा आवडता वडापाव आवडीने खातोच....!!!  

बटाटा वडा - batatavada recipe in marathi आज आपण पाहणार आहोत.

batata vada recipe in marathi

 साहित्य:

 पाच ते सहा बटाटे मध्यम आकाराचे

 सात ते आठ हिरव्या मिरच्या

 चार ते पाच लसूण पाकळ्या

 एक इंच आदरक

 अर्धा चमचा हळद

 अर्धा चमचा जिर

 अर्धा चमचा मोहरी

 चवीप्रमाणे मीठ

 थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना

 तळण्यासाठी तेल पावकीलो

 दोन वाटी बेसन

 अर्धा चमचा खाण्याचा सोडा

 कृती:

 बटाटे कुकर मध्ये उकडून घ्यावेत

 कुकरच्या तीन शिट्ट्या घ्याव्यात

 नंतर वाटण तयार करून घेणे

 मिरची आदरक लसूण आणि जिरे त्यात थोडेसे मीठ घालून

वाटण तयार करून घ्यावे

 नंतर बेसन पीठ पाण्यात खलवून एक तार येई पर्यंत पाणी टाकून मिश्रण तयार करावे

 आणि त्या मिश्रणात खायचा सोडा चिमुटभर मीठ घालावे

 बटाट्याची साले काढून घ्यावीत

 नंतर बटाटा हाताने कूचकरून घ्यावा

 गॅसवर कडई ठेवावी

 कडईत तीन ते चार चमचे तेल घालावे

 तेलामध्ये मोहरी घालावी

 त्यामध्ये आपण वाटण तयार केलेले घालावे

 ते चांगल परतून घ्यावे

 त्यामधे हळद घालावी

 त्यामधे उकडलेले बटाटे त्यात घालावे

 ते सर्व एकजीव करून घ्यावे

 वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालावा आणि ते मिश्रण ताटात काढून घ्यावे

 नंतर त्याचे हाताने गोलसर असे वडे तयार करून घ्यावे

 नंतर आपण बेसनाचे मिश्रण तयार केलेले आहे ते घ्यायचे

 वडे तळण्यासाठी कडईत तेल घ्यावे आणि ते गरम करावे

 आपण तयार केलेले वडे बेसनात बुडवून तेलाच्या कडईत सोडावे

 चांगले खरपूस तळून घ्यावे

 गरमागरम वडा पावा सोबत घेवून खाणे...!!!!

 

टिपः वडा तळत असतात तेल अंगावर उडू नये याची काळजी घ्यावी,आणि हिरवी मिर्ची तळून खाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा