पनीर पराठा - paneer paratha recipe in marathi


 पनीर पराठ

paneer paratha recipe in marathi

साहित्य:

अर्धी वाटी किसलेलं पनीर

एक चमचा लोणच्याचा मसाला

अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

मुठभर कोथिंबीर चिरून

मीठ-साखर चवीप्रमाणे

दोन वाटी गव्हाचे पीठ 

तेल किंवा तूप किंवा बटर .

कृती:

प्रथम सारणाचे जिन्नस तयार करावे. 

सारण - पनीरचा कीस, लोणच्याचा मसाला, चिरलेला कांदा,कोथिंबीर,चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर,हे सर्व एकत्र करावे.

गव्हाच्या पीठाचे 

आठ गोळे तयार करावे.

आता एका फुलक्यावर पनीरचे मिश्रण पसरावं.

त्यावर दुसरं फुलका कडा दाबून चिकटवावा आणि

हलक्या हातांनी लाटावा व तव्यावर शेकावा.

फुलके उरलेले असतील तर त्या फुलक्यात पराठे

तयार करावे .

नाश्ता करतेवेळी या पराठ्यांचा आस्वाद घ्यावा .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा