मसाला दूध - Masala dudh recipe in marathi

मसाला दुध हे विशेषतः कोजागिरी पौर्णिमेला पिले जाते असे एक महत्व त्या दिवसाचे आहे.मसाला दुधात जे सुखे पदार्थ वापरले जातात.आणि त्यात दुधाचे मिश्रण हे शरीरासाठी आरोग्यदायी ठरते,आज आपण मसाला दुध हे कसे करावे हे पाहणार आहोत.


Masala dudh recipe in marathi

साहित्य: १ लीटर दूध, १० ते १५ बदाम तुकडे, १० ते १५ पिस्त्याचे पातळ काप, चिमुटभर जायफळ पावडर, चिमुटभर केशर,चवीपुरती साखर 
कृती: पाण्यात बदामचे तुकडे पाच ते दहा मिनिटे भिजत घालून निथळावेत. आता मिक्सर जारमध्ये पिसता  आणि बदामचे तुकडे घालून भरडसर वाटून घ्यावे. गॅसच्या मंद आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करण्यास ठेवावे. दूध आटत आले की त्यात साखर घालून एकसारखे ढवळत राहावे. साखर विरघळली की त्यात केशर टाकावे. आता वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर त्यात वाटलेले बदाम पिस्ते घालून मिश्रण एकसारखे ढवळत राहावे. दुधाला उकळी आली की आच बंद करावी. आता तयार मसाला दूध ग्लासमध्ये ओतून पिण्यास द्या. अथवा फ्रिजमध्ये ठेवून गार करून पिण्यास देवू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा