इडली सांबार - idli sambar recipe in marathi

इडली सांबार - idli sambar recipe in marathi



idli sambar recipe in marathi

इडली

१ वाटी उडदाची डाळ

२ वाटी साधे तांदूळ 

थोडे पोहे 

मीठ 

तेल

मेथी दाने 

कृती:

१/२ कप उडीदाची डाळ धुवून घेणे  आणि भिजत घालणे 

साधे तांदूळ धुवून घेणे आणि त्यात मेथी दाने टाकून भिजत ठेवणे २ ते ३ तास 

उडीदाची डाळ वाटून घेणे 

साधे तांदूळ व थोडे पोहे वाटून घेणे

वाटूण घेतल्यानंतर दोन्ही एकत्र करणे 

८ तास बाजूला ठेवून देणे 

८ तासा नंतर इडली बनवायला घ्या

तयार झालेल्या पिठात चवीप्रमाणे मीठ घालावे एकत्र करावे

गॅस चालू करावा त्यावर इडलीचे भांड ठेवावे त्यात थोडे पाणी टाकावे

इडलीच्या साच्याचे जे भांडे आहे जिथ आपण इडलीचे पीठ टाकणार आहोत 

तिथे तेल लावावे आणि मग त्या साच्यात इडलीचे पीठ सोडावे ६ भागांन मध्ये 

आणि मग ते गॅस वर असलेल्या भांड्यात ठेवावे ४ ते ५ मिनिट

त्यनंतर इडली चमचा किवा चाकू च्या सहयाने चेक करावी शिजली का नाही ते 

शिजली असेल तर तयार झाली असे समजावे आणि सगळ्या इडल्या काडून घ्यावयात एका प्लेट मध्ये 

आता इडली तयार झाली...!!!


टीप: इडलीचा भांड्यात पाणी गरम करताना अर्धा लिंबू त्यामध्ये चिरून टाकावा कारण भांड काळे पडत नाही.


सांबार 

२ वाटी तुरडाळ 

१ मोठा कांदा 

टोमाटो २ 

थोडीशी कोथांबीर 

कडीपत्ता १० - १२ पाने 

जिरे १ चमचा 

मोहरी १ चमचा 

१ हिरवा भोपळा 

आदरक - लसून पेस्ट १ चमचा 

सांबर मसाला - ३ चमचे 

हळद - अर्धा चमचा 

गरम मसाला १ चमचा 

चवीप्रमाणे मीठ 

मिरची पावडर - २ चमचे 

चिंच आणि गुळाचा कोळ- अर्धी वाटी

तेल पाच ते सहा चमचे 

कृती - मीठ आणि हळद घालून डाळ कुकर मध्ये तीन शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्या.नंतर गॅसवर पातेल ठेवून त्यामध्ये तेल घालायचे आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घालायचे आहे,नंतर बारीक चिरलेला कांदा घालयचा आहे,कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे, टोमाटो बारीक चिरून घालावे,तेल सुटे पर्यंत छान परतून घेणे,आदरक - लसून पेस्ट घालणे वास जाई पर्यंत परतावे,आता सर्व सुक्के मसाले- सांबर मसाला,हळद,गरम मसाला,मिरची पावडर घालुन परतावे आता शिजवलेली डाळ घालावी, बारीक चिरून  भोपळा हा कुकर मध्ये २ शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यावा शिजल्यानंतर तो डाळीत टाकावा,आता तुम्हाला सांबर किती पात्तळ हवी तेवढे पाणी टाकावे,चिंच आणि गुळाचा कोळ घालावा आणि चवीप्रमाणे मीठ घालावे आत्ता त्यावर झाकण झाकून उकळी येवू द्यावी आणि उकळी आल्यानंतर कोथम्बीर टाकावी आता इडली सांबरचा आनंद घ्यावा.

सांबर पोहयासोबतही छान लागते Try करा....!!!


कांदे पोहे - Kande pohe recipe in marathi



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा