मिर्चू -mirchi pickle recipe in marathi

 

मिर्चू -mirchi pickle recipe in marathi 


नमस्कार तुम्हाला आज एक असा पदार्थ सांगणार आहे जो तिखट खाणार्यांसाठी आहे.आणि तो साध्या जेवणाची चव आणखी वाढवणारा आणि जिभेला पाणी आणणारा आहे आणि तो म्हणजे मिरचीचे सुके लोणचे याला गावरान भाषेत मिर्चू असेही म्हणतात 

मिर्चू -mirchi pickle recipe in marathi हा पदार्थ सर्वांना आवडणारा आहे जो प्रत्येक जण आवडीने खातो चला तर मग पाहूया....!!!!

mirchi pickle recipe in marathi

साहित्य: वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या

              ५० ग्राम मोहरी

              चवीप्रमाणे मीठ 

              अर्धा चमचा हळद

              २ लिंबू

कृती: वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घ्याव्यात त्या मधून सुरीने चिरा करून घ्यावेत नंतर मोहरी मिक्सरला बारीक वाटून घ्यावी.आता चिरलेल्या मिरच्या एका ताटात  काढून घ्याव्यात आणि त्यामध्ये मीठ, हळद,बारीक वाटलेली मोहरी घालावी आणि हे सर्व मिश्रण हाताने मिसळून घेणे,हे सर्व मिक्स करून झाले कि त्यामध्ये २ लिंबू चिरून घालावेत.सर्व तयार झालेले मिश्रण एका काचेच्या बरणीत मुरायला ठेवावे...!!! 

टीप: मिश्रण मिक्स करताना मिरचीने हाताची आग होऊ नये म्हणून हात धुतल्या नंतर हाताला खोबरे तेल लावावे..!!

          

         

         

         





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा